Library

 

आपल्या महाविद्यालयाच्या स्वतंत्र आणि प्रशस्त इमारतीत समृध्द ग्रंथालय आहे. विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यासाठी स्वतंत्र वाचनकक्ष, स्वयंपुर्ण अभ्यासिका आणि वेगळा ग्रंथ देवाण घेवाण कक्ष याची व्यवस्था असलेले ग्रंथालय हे महाविद्यालयाचे वैभव आहे. ग्रंथपाल प्रशिक्षित, अनुभवी आणी कर्तव्य तत्पर आहे.


१) ग्रंथालयाचे सभासदत्व स्वीकारण्यासाठी विद्यार्थ्यांनी ग्रंथपालांशी संपर्क साधुन ग्रंथालयाचे ओळखपत्र प्राप्त करुन घेणे

२) प्रत्येक विद्यार्थ्याला ग्रंथालयातुन प्रत्येक वेळी एक क्रमिका आणि एक पुरक अशी दोन पुस्तके वाचणासाठी मिळु शकतील. मात्र प्रत्येक वर्गातील काही निवडक. हुशार विद्यार्थ्याला आणखी दोन अतिरिक्त पुस्तके उपलब्ध करुन देण्यात येतील

३) प्रत्येक विद्यार्थ्याने वाचणासाठी नेलेले पुस्तक सात दिवसाच्या आत परत करावे. त्यानंतर ते परत करणाऱ्या विद्यार्थास प्रत्येक पुस्तकाला प्रतिदिन ५ रू या प्रमाणे दंड आकारल्या जाईल. हा दंड भरल्याशिवाय त्यांना दुसरी पुस्तके मिळणार नाहीत.

४) ग्रंथालयातुन पुस्तकाची देवाणघेवाण करताना ओळखपत्र दाखवणे आवश्यक आहे.

५) विद्यार्थ्याकडुन एखादे पुस्तक हरवल्यास ग्रंथालयाशी तशी माहिती देउन पुस्तकाची दुप्पट किंमत लगेच भरुण द्यावी. आठ दिवसानंतर माहिती दिल्यास प्रत्येक दिवसासाठी ५ रू दंड आणि पुस्तकाची दुप्पट किंमत भरुण द्यावी लागेल. त्याशिवाय त्याला पुस्तक मिळणार नाही. तसेच ही सर्व रक्कम भरल्याशिवाय लायब्ररी क्लिअरन्स सर्टीफिकेट मिळणार नाही.

६) पुस्तकाच्या कोणत्याही पानावर शाईने किंवा पेन्सिलने खुणा (अंडरलाइन) करु नये. पुर्वी केलेल्या असल्यास तसे निदर्शनास आणुन द्यावे. तसे करणाऱ्या विद्यार्थ्यांवर ग्रंथालय सल्लागार समिती च्या निर्देशानुसार दंडात्मक कार्यवाही केली जाईल.

७) काही विद्यार्थी पुस्तकातील महत्वाची पाने फाडुन घेतात. असे बेशिस्त वर्तन करणाऱ्या विद्यार्थ्याकडुन त्या पुस्तकाची दप्पट किंमत दंड म्हणुन वसुल केली जाईल.

८) पुस्तकांची देवाणघेवाण आणि ग्रंथालयाचे इतर कामकाज करण्यासाठी ग्रंथालय सकाळी १०.०० ते ५.०० या वेळेत (दुपारी १.०० ते २.०० ही मधली सुटी सोडुन) खुले राहिल.
वाचनालयात ओळखपत्रा शिवाय प्रवेश मिळणार नाही.

९) वाचनालयात ओळखपत्रा शिवाय प्रवेश मिळणार नाही. वाचन कक्षात पाठ्यपुस्तका-शिवाय संदर्भ पुस्तके, दैनिके, नियकालिके व प्रश्नपत्रिका संच इत्यादी ओळखपत्रावर मिळतील.

१०)वाचनालयातील साहित्य वाचनानयाबाहेर घेऊन जाता येणार नाही. वाचनालयात व ग्रंथालयात सबंधित कर्मचाऱ्याशी उध्दटपणे बोलणे, अज्ञाभंग करणे, बेशिस्त वर्तन करणे, ग्रंथालयाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विद्यार्थास ग्रंथालयाच्या सवलती बंद केल्या जातिल, तसेच त्यांना दंड केला जाईल. अथवा प्रवेश रद्द केला जाईल.