Home

सचिवांचे मनोगत :-

प्रिय विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो,

उच्चत्तम विद्याक्षेत्रांची व उज्ज्वल कारकिर्दीची दारे आजच्या या सुवर्ण क्षणी तुमच्यासाठी उघडणार आहेत. आजचा दिवस हा तुमच्या जीवनातील अनमोल दिवस आहे. ज्यासाठी तुम्ही साऱ्यांनी अहोरात्र मेहनत केलीत त्याचेच फळ म्हणुन तुम्हाला ज्ञान, माहिती, कौशल्ये आणि शिस्त याची फार मोठी पुंजीच प्राप्त होणार आहे, ज्याच्या आधारे तुम्हाला तुमचा भविष्याकाळ घडविता येईल. तुम्हाला तुमच्या यशस्वी कारकिर्दीच्या शुभेच्छा देत असतांना आवर्जुन एक गोष्ट सांगाविशी वाटते ती अशी की, स्वतःच्या विकासाबरोबरच देशाच्या व समाजाच्या विकासाशी स्वतःला जोडुन घ्या. आज तुम्हाला जे शिक्षण व ज्ञान मिळणार आहे त्याचा उपयोग आयुष्यात शिक्षणाची ज्योत उजळण्यासाठी करा.

रामानंद महाविद्यालय वर्ष २०२१ पासुन शैक्षणिक प्रवास सुरु केला. संस्थेने बी.ए. योग शास्त्र, व किर्तन शास्त्र या अभ्यासक्रमाची सुरुवात केली.

विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो आपण लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चीत करून या सुवर्ण संधीचा लाभ घ्या. विकासाच्या क्षितीजावर भारत एक जागतिक नेतृत्व करणारा देश म्हणुन उदयाला येत असतांना, त्या अमर्याद क्षितीजावर अधिराज्य गाजविण्यासाठी मशिक्षणफहा आणि हाच एक मूलमंत्र आहे.

अभ्यासक्रम कसा निवडावा

१२ वी नंतर जेंव्हा आपण महाविद्यालयात प्रवेश घेतो, त्यावेळी बहुसंख्य विद्यार्थ्या समोर प्रश्न निर्माण होतो की, कोणती ज्ञानशाखा निवडावी ? पालकांसमोरही हाच प्रश्न पडतो. ज्यांचे शिक्षणाचे उद्दिष्टे स्पष्ट असते, अशा विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडत नाही. पुढे आपल्याला काय व्हायचं, हे निश्चित केले तर विद्याशाखेची निवड सहज करता येते.

जो अभ्यासक्रम आपण निवडणार, तो आपण का शिकला पाहिजे ?

तो शिकल्यामुळे आपल्याला नेमका कोणता उपयोग होणार आहे. त्यातून आपणास कोणती नोकरी मिळु शकेल, अथवा कोणता व्यवयाय करता येईल. कोणता आर्थिक फायदा होइल याची माहिती करून घेतली पाहिजे. तसेच आपल्या आवडीचा विषय कोणता आहे, कोणती शाखा आवडते, कोणत्या अभ्यासक्रमात आपण प्रगती करु शकतो किंवा आपल्या मर्यादा काय आहे हेही लक्षात घेतले पाहिजे.

अभ्यासक्रमाची निवड करताना आपली बौध्दिक पातळी आवड महत्वाची आहे. पालकाच्या इच्छेमुळे, मित्राच्या आग्रहामुळे किंवा मैत्रिणीच्या सोबतीमुळे आपणास नको असलेल्या अभ्यासक्रमाची निवड करू नये. विद्यार्थ्यांनी स्वतः च्या बौध्दिक पात्रतेनुसार अभ्यासक्रमाची निवड केली तर ते त्यात अधिक प्रगती करु शकतात. कोणती विद्याशाखा निवडल्यास आपल्याला कोणत्या व्यावसायिक संधी निर्माण होतात हे पुढिल प्रमाणे सांगता येईल..

 

कला शाखे नंतर संधी

१) एम.ए.
२) एम.बी.ए.
३) बी.एड्. / बी.पी.एड्.
४) बी.लीब. / एम.लीब.
५) एल.एल.बी.
६) एम.एस. डब्ल्यू.
७) कॉम्प्युटर प्रोग्रामिंग
८) डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट
९) बी.जे. / एम.जे.